या दहशतवाद्याला न्यायालयाने दिली मृत्यदंडाची शिक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने आज(सोमवार) फाशीची शिक्षा सुनावली.

पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. साकेट कोर्टाने ही अत्यंत दुर्मीळ केस असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’ शी कथित स्वरुपात जोडलेल्या आरिज खान याला मृत्यूची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

दरम्यान या प्रकरणी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स अॅक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरवले होते.

आरिझ २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणानंतर फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

पोलीस याबाबत म्हणाले की, हे केवळ हत्याचं प्रकरण नाही तर न्यायाचं संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हत्याचं प्रकरण आहे.

आरिज खानच्या वकिलांनी मृत्युदंडाचा विरोध केला. यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव सायंकाळसाठी निर्णय सुरक्षित ठेवला होता.

न्यायालयाने 2008 मध्ये बाटला हाउस चकमकीदरम्यान दिल्ली पोलिसांचं विशेष कक्षाचे निरीक्षक अधिकारी शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. आणि इतर गुन्ह्यांसाठी आरिज खानला 8 मार्च रोजी दोषी ठरविण्यात आलं होतं.

न्यायालयाने सांगितलं होतं की, आरिज खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळी चालवून त्याची हत्या केली, असं सिद्ध होत आहे. अखेर न्यायालयाने आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24