चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून कपड्यांची केली चोरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले एका टेलरच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे.

चोरटयांनी या टेलरच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमधील कपडे चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान नवनाथ निवृत्ती सोनवणे (वय-३८) यांच्या दुकानातील कपड्यांची चोरी झाली आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी कि, फिर्यादी नवनाथ सोनवणे व आरोपी सागर सोनवणे हे एकाच गावातील रहिवाशी असून फिर्यादी नवनाथ सोनवणे हे व्यवसायाने टेलर आहे.

त्यांनी नेहमी प्रमाणे आपले दुकान सायंकाळच्या सुमारास बंद करून ते घरी गेले असता आज पहाटे एक वाजेच्या सुमारास आरोपी सागर सोनवणे याने फिर्यादीच्या दुकानाचे शटर बंद असताना त्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून त्यातील सुमारे पाच हजारांचे कपडे आपल्या फायद्यासाठी चोरून नेले आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सागर सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24