चोर तर चोर आणि वर शिरजोर ; डॉक्टरची महापालिका पथकाला धक्काबुक्की

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासन करत आहे.

मात्र खुद्द एका कोरोना योध्यानेच नियमांचे उल्लंघन करत चक्क महापालिकेच्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

मास्क व्यवस्थित परिधान ने केलेल्या डॉक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या डॉक्टरने धक्काबुकी केली. याप्रकरणी डॉ. पुरूषोत्तम सुंदरदास आहुजा विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने मास्क न वापरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. महापालिकेने देखील मास्क न घालणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे.

महापालिकेचे करोना प्रतिबंधक पथक शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता प्रोफेसर कॉलनी चौकात मास्क न घालणार्‍यांविरोधात कारवाई करत होते. डॉ. आहुजा नाकावरील मास्क तोंडाच्या हनुटीवर घालून फिरत होते.

या डॉक्टरला थांबवून पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यावर डॉक्टरने पावती करणारे विष्णू देशमुख यांना मारहाण केली. याप्रकरणी पथकाने मारहाण करणार्‍या डॉक्टरला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, पोलीस बंदोबस्त मिळाला, तरच महापालिकेचे कर्मचारी मास्क न वापरणार्‍यांविरोधात उद्यापासून कारवाई करतील, अशी भूमिका महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी मांडली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24