अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात सर्वत्र चोरट्याने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. सोने -चांदीचे दागिने लुटण्याचे अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे आधीच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान एका चोरट्याने दागिने चोरले व चक्क हे दागिने गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढले संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगमध्ये असलेले १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून लंपास केले होते.
याप्रकरणी पोलसांनी कसून चौकशी केली असता आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक मूळ रा. समशेरपूर ता. अकोले यास अटक करण्यात आले असून १ लाख १७ हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस तपासात आरोपीने चोरीचे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेऊन कर्ज काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चार चाकी गाडी घेऊन पाठवले होते. सदर गाडीचालक रविकिरण सुखदेव मंडलिक हा पाठविण्यात आला होता.
१७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता भाऊपाटील यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले. यावेळी मंडलिक यान गाडीतील बॅगा घरासमोर आणून ठेवल्या होत्या.
बहिण हि ३१ डिसेंबरला मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमध्ये दागिने नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे भाऊ पाटील नवले यांनी गाडी चालक रविकिरण मंडलिक याने दागिने चोरले असल्याची फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद करून मंडलिक यास ताब्यात घेण्यात आले. या आरोपीने संगमनेर येथील एका पतसंस्थेत ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण,
कानातील झुबे गहाण ठेऊन कर्ज काढल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहे.