गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गोठ्यातून गायीची चोरी करणाऱ्या चोरट्याला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान या चोरट्याच्या ताब्यातून तालुका पोलिसांनी गायीसह पिकअप ताब्यात घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील पशुपालक विनायक बछिडे यांनी घरासमोरील अंगणात पाच गाया बांधल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक गाय नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूला गायीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.

गाय कोणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गायीचा तपास करण्यास सुरुवात केली असता

गावातीलच दत्तात्रय लक्ष्मण कोल्हे (रा.चंदन टेकडी) याने गाय चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी कोल्हे याच्याकडून वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप व साठ हजार रुपयांची गाय ताब्यात घेत अटक केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24