अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी बदलले मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर बनत चालली आहे.
आता या चोरट्यांना लगाम लावणार कोण ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नुकतेच राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथे लोणी रस्त्यालगत असलेल्या भुसार मालाच्या व्यापाऱ्यास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मारहाण करत
दुकानातील दोन ते तीन लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर येथे लोणी रस्त्यावर जोगेश्वरी ट्रेडिंग नावाचे भुसार मालाचे दुकान आहे.
एके रात्री अज्ञात चार ते पाच जणांनी दुकानात प्रवेश करत भुसार मालाच्या व्यापाऱ्यास मारहाण करीत त्याच्याजवळील दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
या घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या प्रकारात आम्हाला शंका असल्याने गुन्हा दाखल केला नाही असे उत्तर मिळाले.