अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली असून दररोज 40 हजार जणांचे लसीकरण सुरु आहे. आतापर्यँत 50 लाखांवर लोकांना लास देण्या आली आहे.
तर आता तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू होऊ शकते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. प्रथम आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धये, 50 वर्षावरील व त्याखालील अशी वर्गवारी करून लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती व ज्यांना सहव्याधी आहे अशा 50 वर्षांखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे 1 मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.
राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 652 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ाला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱयांची नोंदणी झाली असून
त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण झाले आहे. 5 लाख 47 हजार फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे.