अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, काेविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून (१ मार्च) सुरु करण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील जाेखमीचे आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर टप्पा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात राबविण्यात येणार आहे. जी खासगी रुग्णालय जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील, अशा रुग्णालयांना लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.
पालिका व शासकीय रुग्णालयात लसीकरण निशुल्क: असून खासगी रुग्णालयात प्रत्येकी डाेससाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात १५० रुपये लसीचे व १०० रुपये सेवा शुल्क असेल, असे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून जनआरोग्य योजना राबविण्यात येणा-या व केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजना राबवत असलेल्या ५३ रुग्णालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
नियमानुसार, पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादीसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने या केंद्रांत लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१ मार्च २०२१ पासून नमुद करण्यात आलेल्या महानगरपालिकेतील कोविड लसीकरण केंद्रात तिसरा टप्प्यातील नागरिकांसाठी विनामूल्य लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
नोंदणी कशी करावी ?:- कोरोना लस मिळविण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी Co-WIN2.0 App ची मदत घेतली जाऊ शकते किंवा www.cowin.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करता येईल.
नोंदणी करताना आपल्याला आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल, ज्यावर वन टाइम संकेतशब्द (OTP) येईल. या ओटीपीच्या माध्यमातून आपण आपले खाते तयार करण्यास सक्षम असाल. खाते तयार झाल्यानंतर कागदपत्रांमधील नाव, वय, लिंग, पत्ता भरा. आयडी प्रविष्ट करा
लस कोठे असेल आणि कोणत्या दिवशी लसीकरण होईल हे आपण निवडण्यास सक्षम असाल. एका मोबाइल नंबरवर 4 लोकांची नोंदणी करता येते. 1507 वर कॉल करून आपण लसीशी संबंधित अधिक माहिती देखील मिळवू शकता.
असेल ह्या कागदपत्रांची गरज