अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. प्रत्येक भारतीय ही लाट ओसरण्याची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, ही लाट ओसरल्यानंतर भारतीयांना तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.
ऑक्टोबरनंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊल, अशी शक्यता केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन सदस्यांच्या समितीने व्यक्त केली आहे.
याचबरोबर, कोरोनाची दुसरी लाट जुलैमध्ये ओसरेल, असा अंदाजही या समितीने वर्तविला आहे.समितीन तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो, याचाही अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठले आहे, असे समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे.
मॉडेलनुसार, तामिळनाडूत 29 मे 31 मे दरम्यान आणि पुद्दुचेरीत 19 ते 20 मे दरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांनी अद्याप रुग्णवाढ पाहिलेला नाही. आसाममध्ये 20-21 मे, मेघालयमध्ये 30 मे आणि त्रिपुरामध्ये 26-27 मे रोजी रुग्णसंख्येचे शिखर गाठले जाऊ शकते.