कोरोनाचा धोका कायम; अक्ख कुटुंबच बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे.

सर्व उद्योग व्यवसाय देखील जोरात सुरु झाले आहे. यामुळे कोरोनाची भीती देखील लोकांच्या मनातून गेल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले होते. मात्र नुकतेच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उंदिरगाव येथे एकाच कुटुंबातील मंगळवारी दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले.

सध्या तालुक्यात 25 कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर येथील दोन खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय आणि बुथ हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल राजगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंदिरगाव परिसरातील हरेगाव रस्ता समोरील एका कुटुंबातील एक जण पुणे येथून प्रवास करुन घरी आल्यानंतर त्याला ताप आला.

त्यानंतर त्याने निमगावखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोविड तपासणी केली. त्यात त्याच्यासह कुटुंबातील चौघेजण कोरोना बाधित आढळून आले.

दरम्यान, उंदिरगाव येथील प्राथमिक आरोग्य विभागाने सदर कुटुंबातील अन्य लोकांची कोविड तपासणी केली. त्यात सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

तपासणीनंतर सर्वांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहेत. शहरासह ग्रामीण भागात सातत्याने गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सर्व जनजीवन सुरळीतपणे सुरु होत असताना अचानकपणे राज्यातील अनेक भागात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संकट अद्याप कायम आहे, भान बाळगा सध्या अनेक नागरिक सर्रास विनामास्कचे फिरत असल्याचे जागोजागी दिसून येते. बाजारात, बस स्थानकात,

रेल्वे स्थानक परिसरासह शहरात सर्वत्र गर्दीच्या ठिकाणी विनामास्कचे नागरिक हमखास आढळून येतात. त्यातील अनेकजण सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान,

तंबाखूजन्य पदार्थ खाऊन खुलेआम थुंकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे कोरोना विषाणू पुर्णपणे संपत नाही.

तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा नियमित वापर करणे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आपल्या घरास परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे बनले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24