file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हार लोणी रस्त्यावर घोगरे मळा येथे घडली आहे.

या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. नितीन मुरलीधर गायकवाड (वय 37), अमोल विकास उनवणे (वय 34) दोघे रा. कोल्हार, स्वामी साहेबराव जाधव, रा. सोनगांव असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नांवे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तिघे घरी दुचाकीवरून जात होते. लोणी येथील प्रवरा पब्लिक स्कुल जवळील घोगरे यांच्या पेरूच्या बागेजवळ येताच बांधावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रथम नितीन गायकवाड व अमोल उनवणे या दोघांवर हल्ला केला.

यामध्ये नितीन याच्या पायाला मोठी जखम झाली तर अमोल यासही पायावर खोलवर दात लागले. दोघांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका केली.

मात्र मागे दुसर्‍या दुचाकीवरून येणार्‍या त्यांच्या जाधव या मित्रास बिबट्याने लक्ष केले. त्यालाही किरकोळ जखम झाली. तिघे घटनास्थळावरून पळाले. जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघांची प्रकृती ठीक आहे.