महसूल पथकाने पकडलेला डंपर ‘त्या’ तिघांनी पळविला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर तालुक्यातील इस्लामपुर ते शिंगवे नाईक रोडवर महसूलच्या पथकाने पकडलेला डंपर तिघांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कामगार तलाठी दिलीप श्रीधर जायभाय (रा. भिस्तबाग) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार गणेश रामदास बर्डे, वैभव गंगाधर उकांडे (दोघे रा. इस्लामपुर) व डंपर चालक (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इस्लामपुर शिवारात विनापरवाना गौण खनिज मुरूमाची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली होती.

त्यांनी महसूलचे एक पथक कारवाईसाठी पाठविले. पथकाने चार ब्रास मुरूमाची वाहतूक करताना एक विना क्रमांकाचा डंपर पकडला. सदरचा डंपरमध्ये कोतवाल विजय पांडुरंग बर्डे यांना बसविले.

ते डंपर घेऊन मनमाड रोडने नगर तहसील कार्यालयात येत असताना तिघांनी कॉटेज कॉर्नर येथून डंपर पळविला. पिंपळगाव माळवी शिवारात कोतवाल बर्डे यांना शिवीगाळ,

दमदाटी करून उतरून देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24