अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील रायतळे येथील गणेशवाडी येथे एका हॉटेल बाहेर झोपलेल्या वेटरला चाकूचा धाक दाखवून तीन अज्ञात चोरांनी हॉटेल मधील 43 हजार रुपये किमतीचा मिक्सर चोरून नेला.
या बाबतची अधिक माहिती अशी की मिठू नामदेव येणारे (वय.52 रा.गणेश वाडी रायतळे तालुका पारनेर) यांच्या हॉटेलचा वेटर हॉटेल बाहेर झोपलेला असताना तीन अनोळखी चोरांनी त्याला उठून चाकूचा धाक दाखवला.
आणि हॉटेल उघडण्यास सांगितले. हॉटेल उघडल्यानंतर चोरांनी आत प्रवेश करून आतील उषा कंपनीचा मिक्सर चोरून नेला.
याप्रकरणी सूपा पोलिसांनी मिठू येणारे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार कुटे हे करीत आहेत.