अहमदनगर जिल्ह्यातील या रस्त्यावर ‘द बर्निंग कारचा’ थरार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिबलापूर-संगमनेर रस्त्यावर ‘द बर्निंग कारचा’ थरार गुरुवारी रात्री ८ वाजता पाहायला मिळाला. फोर्ड कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली.

प्रसंगावधान राखत आश्वी खुर्दचे उपसरपंच सुनिल तुकाराम मांढरे आणि उमेश गाडे वेळीच बाहेर पडले. फोर्ड कार (एम.एच. ०५ ए.जे. ७७१४) सुनिल मांढरे यांची आहे.

संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. तोवर कार जळाली होती. ये-जा करणारे प्रवाशी थांबले, मात्र बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

याबाबत अधिक माहिती अशी, आश्वी खुर्दचे उपसरपंच सुनिल तुकाराम मांढरे व उमेश गाढे संगमनेहून गावाकडे परतत होते. त्यावेळी गोसावी फाटा परिसरात यांच्या कारमधून (एमएच 05 एजे. 7714) च्या इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडून अचानक धुर येऊ लागला.

त्यामुळे कार थांबवून त्यांनी काय झाले असावे याची पाहणी करीत असतानाच, अचानक आगीच्या ज्वाला उठून, त्यात कारने पेट घेतला. वाहनातील इंधन, फोम व रेक्झीनचे सीट आदी ज्वलनशिल वस्तूंमुळे ही आग भडकली.

दोघेही या वेळी कार बाहेर असल्याने सुदैवाने बचावले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होवून त्याने आग विझवली. मात्र तो पर्यंत आगीत कार जळून खाक झाली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24