‘त्या’ सात पोलिस कर्मचाऱ्यांचा काळ आला होता पण वेळ…!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगरहून पुण्याच्या दिशेने सिमेंट घेऊन निघालेला ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील अहमदनगर जिल्हा हद्दीवरील चेक पोस्टजवळून गेल्याने यावेळी बंदोबस्तासाठी असलेले सात पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले.

नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे जिल्हा सरहद्दीवर बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत वाहन तपासणीसाठी तात्पुरती चौकी उभारली आहे .

रविवारी संध्याकाळी पाच वाचता  नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव निघालेला सिमेंट ट्रेलर ट्रक (एम एच १२ एल टी ४०५० ) वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या पोलीस चौकीपासून फक्त एक फुटावरून धडधडत गेल्याने क्षणभर पोलीसांच्या काळजाचा ठोकाच चुकला होत .

परंतु सुदैवाने कोणासही धक्का देखिल लागला नाही. ट्रक चौकीवर येत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखून पोलिस कर्मचारी ठोकळ यांनी इतरांना बाजूला ढकलले. यावेळी चौकी शेजारी उभ्या असलेल्या दुचाकीला  ट्रकची धडक बसल्याने दुचाकी खड्ड्यात गेली .

मात्र सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही या अपघातातून बचावलो अशी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया होती . दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी धान्याचा ट्रक उलटला होता त्यावेळी शिरूर पोलीस थोडक्यात  बचावले होते .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24