काळ आला होता पण वेळ नव्हती ! वीजवाहक तार अंगावर पडून बैलांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- सध्या शेतात खरीप हंगाम असल्याने शेतकरी पेरणी व इतर कामे करण्यात व्यस्त आहेत. मात्र त्यांचे पाठीमागे अनेक संकट येत आहेत. शेतात कामासाठी बैलगाडी घेऊन जात असलेल्या शेतकऱ्याच्या या बैलगाडीवर वीजवाहक तार कोसळली.

सुदैवाने वेळीच बैलगाडीतुन उडी मारल्याने बापलेक बचावले. मात्र यात दोन दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे काळ आला होता पण वेळ नव्हती असेच या दोघांच्या बाबतीत घडले. नागपूर जिल्ह्यातील कोंढासावळी गावातील बलराम भोयर शेतात खरीप हंगामाच्या कामासाठी बैलगाडी घेऊन सोनमोह शिवाराकडे निघाले.

नदीपात्राजवळील डाव्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी तुटून वीजतारांवर पडली. त्यामुळे तार तुटली व तेथून जाणाऱ्या बैलगाडीवर पडली. यावेळी बलराम भोयर (४०) व त्यांचा मुलगा शिव बलराम भोयर (७) या बापलेकाने वेळीच बैलगाडीतून उडी मारल्याने सुदैवाने ते दोघे बचावले.

मात्र वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी मृत बैलांचा पंचानामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. बैलांच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24