मुसळधार पावसामुळे पेरणी पूर्व मशागीच्या कामाला अनकूल स्थिती निर्माण झाली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले शहर व परिसराला काल रविवारी सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसाने अकोले व परिसराला सुमारे तास दीड तास चांगलेच झोडपले.

या मुसळधार पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. शहर व परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

शहरातील कारखाना रस्त्यावरील वाहणारे पाणी निशिगंधा कॉलनी परिसरात घुसले. साठलेल्या या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर केरकचरा दिसत होता.

शहरातील रस्त्यावर पाण्याचे लोट वाहतांना दिसत होते. तर दुसरीकडे या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साठले होते.

मशागतीच्यादृष्टिने हा पाऊस उपयुक्त आहे. या पावसाने पेरणी पूर्व मशागीच्या कामाला अनकूल स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे मशागतीच्या कामांना काही ठिकाणी सुरुवात होऊ शकेल. पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24