कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-ट्रकचे पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी ट्रकचालकास गिल्वर व कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडील १२ हजार ५०० रूपये रोख व फास्टट्रॅककंपनीचे घड्याळ असा ऐवज बळजबरीने काढून नेला.

ही घटना शेंडी बायपासवर घडली. याबाबत ट्रकचालक राहुल बाळू लोंढे (रा.फकराबाद,ता.जामखेड) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, लोंढे हे त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा बल्कर गाडी (क्र.एमएच १२ एसएफ ९६९४) घेवून जात होते.

दरम्यान शेंडी पोखर्डी शिवारातील गजराजनगर फाट्याजवळ त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला गाडी लावून ते टायर बदलत होते.

यावेळी विनाक्रमांकाच्या दोन अपाची मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी पाच जणांनी त्यांच हातातील गिल्वर व कोयत्याचा धाक दाखवत ट्रकचालक लोंढे यांच्याकडील ३२०० व मनोज गणावत यांच्याकडील ७३०० रेख रक्कम व एक फास्टट्रक कंपनीचे घड्याळ असा एकूण १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी ट्रकचालक लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोसई जाधोर हे करत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24