अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर लोखंडी प्लेटाचे रोल घेऊन जाणारा ट्रक उलटला.
वळणाला मोठा कठडा असल्याने त्यात ट्रक अडकल्याने तिघे बचावले. याबाबत अधिक माहिती अशी कि,
कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात लोखंडी प्लेटाचे रोल पुण्याहून परभणीला घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणाचा चालकास अंदाज न आल्याने उलटला.
या ट्रकमध्ये चालक, क्लिनरसह दिघे प्रवास करत होते. ट्रकमधील तिघेही जखमी झाल्याने त्यांना नगरच्या दवाखान्यात हलविण्यात आले.
ट्रकमधील काही लोखंडी रोल खोल दरीत पडले. अपघाताची खबर मिळताच पोलीस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली.