आर्थिक व्यवहारातून दोघांनी एकावर कोयत्याने वार केला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर तालुक्यातील हातवळण शिवारात आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून एकावर दोघा जणांनी कोयता, दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शिवाजी विश्‍वनाथ चेमटे (रा. हातवळण) व नामदेव निकम (पूर्ण नाव माहिती नाही रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या हल्ल्यात परसराम दशरथ नवसुपे (वय 35 रा. मठपिंप्री ता. नगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, परसराम नवसुपे व आरोपी यांच्यामध्ये जनावराच्या गोठ्यात मुरूम टाकण्यासाठी पैशाचा व्यवहार झाला होता.

याच कारणातून शिवाजी चेमटे याने हातातील कोयत्याने परसराम यांच्या पाठीमागून डोक्यात वार केला. तसेच नामदेव निकम याने परसराम यांच्या पाठीत दगड मारला. या मारहाणीत परसराम नवसुपे जखमी झाले आहेत.

जखमी नवसुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करत आहे. दरम्यान आर्थिक देवाण – घेवाण फिस्कटली कि वाद आणि त्यानंतर असे प्रकार घडण्याचे प्रमाण हल्ली वाढू लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24