दोघेजण सरकारी कार्यालयाच्या परिसरात एकमेकांसोबत भिडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- दोन तरूणांमध्ये आपापसात वाद झाले आणि त्यांनी एकमेकांवर दगड व विटाने मारहाण झाली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावर घडला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार आजिनाथ पाखरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सागर गुंजाळ व लक्ष्मण दळे या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी सागर अशोक गुंजाळ रा. आझाद चौक, राहुरी, लक्ष्मण सोपान दळे रा. गणपती घाट,

राहुरी हे दोघेजण शहरातील स्टेशनरोड परिसरात असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या गेटसमोर एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मारहाण करत होते.

यावेळी हवालदार सचिन ताजणे यांनी त्यांना मारामारी करू नका, शांत रहा. असे सांगितले. मात्र, त्या दोघांनी ऐकले नाही.

कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची भांडणे सोडविली. यावेळी आरोपी सागर अशोक गुंजाळ याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी लक्ष्मण सोपान दळे हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24