रस्तालुट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  वाढत्या चोऱ्या, लुटमारी आदी घटनांमुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरट्यांना अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. नुकतेच कोपरगाव तालुका पोलीस पथकाने रस्तालूट करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,भाऊसाहेब धर्मा होन, वय ५३ वर्षे रा.चांदेकसारे ता.कोपरगाव जि.अहमदनगर यांनी फिर्याद दिली की,त्यांना दि.१ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० वाजता आहेर वस्ती साईमंगल कार्यालयाजवळ सावळीविहीर ते झगडे फाटा रोड येथे तीन ते चार अनोळखी चोरटयांनी त्यांच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावून लुटले होते.गाडीतील तिघांनी त्यांच्याकडील मोबाईल व रोख ६ हजार २०० रुपये बळजबरीनेचोरून नेले.

त्यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती समजली कि, आरोपी आरिफ अमिन सय्यद (वय १९ वर्षे रा.देशमुख चारी, शिर्डी. ता.राहाता) याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ संशयित आरोपी आरिफ अमिन सय्यद यास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पैसे व मोबाईल बाबत पोलिसी खाक्या दाखवून विचारपुरस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वैभव संधन रा.रुई ता.राहता याच्याकडील इ कार व सोबत दोन अल्पवयीन मुले असल्याचे सांगितले.

गुन्हातील मोबाईल अजय विजय काळे रा.पुणतांबा ता.राहता यांना विक्री केला असल्याचे सांगितले.सोमवारी रात्री साडेदहा वाजता चोरीचा मोबाईल विकत घेणारा आरोपी अजय विजय काळे यास अटक करुन त्याच्या कडून माोबाईल हस्तगत करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24