अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी शेडगाव, जवळा येथे कोम्बिंग ऑपरेशन करून दोन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे, राहुल भारत चव्हाण (रा. जवळा, ता. जामखेड) या दोघांना अटक करण्यात आली असून गेल्या 6 वर्षांपासून पोलीस यांच्या मार्गवर होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २५ जून रोजी रंजना मारुती भदे (रा. शेडगाव) या महिलेच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ११ हजारांचा ऐवज लंपास केला होता. संतोष काळे हा जवळा येथील रहिवासी असला तरी गणेशवाडी (ता. कर्जत) येथे राहून दरोडे, चोऱ्या करीत होता.
संतोषवर लोणी काळभोर, उरुळी कांचन (जि.पुणे), श्रीगोंदा, जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे; मात्र तो सहा वर्षांपासून फरारी होता.
राहुल भारत चव्हाण याच्याविरोधात बारामती व श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी शेडगाव, जवळा येथे कोम्बिंग ऑपरेशन करून या दोघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.
हि कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी केली.