file photo

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अ‍ॅपे रिक्षातून साहित्य चोरून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एक लाखाचा मुद्देमाल व अ‍ॅपे रिक्षासह अक्षय राजू देठे (१९, मालपाणी हेल्थ क्लब), अजित अरुण ठोसर (इंदिरानगर) या दोघांना ताब्यात घेतले.

बाबू कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही) हा पसार झाला. तिघे चोरटे अ‍ॅपे रिक्षात (एमएच १७ बीवाय २७३४) लोखंडी सोल्जर, प्लेटा व रॉड चोरून नेत होते.

सुपरवायझर सतीष येवले यांनी विचारपूस केली असता त्यांना रॉडने जिवे मारण्याची धमकी देत चोरटे पसार झाले. येवले यांनी तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.