अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-गेल्या तीन दिवसापूर्वी सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून दोन अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून दोन अल्पवयीन मुली घरातून गेल्यानंतर त्या घरी परतल्याच नाही.
खूप वेळ वाट पाहिल्यानंतर मुलींचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने नाइलाजस्तव नातेवाईकांनी सोनई पोलिस ठाणे गाठले. व मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान शनिवारी दुपारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रविण अव्हाड व अमोल जवरे यांनी एका मुलाच्या मोबाईल लोकेशनवरुन पानेवाडी (ता.पाथर्डी) हून भगवानगड रस्त्यावर पायी जाताना मुलीस ताब्यात घेतले.
बरोबर असलेल्या एका नातेवाईकाने दोन्ही मुलीस ओळखले आहे. रात्री उशिरा जवाब व आवश्यक बाबी पूर्ण करुन मुली नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे.