लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार राज्यातील ‘या’ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते नारायण राणे आणि खासदार हिना गावित यांचा समावेश करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता किंवा संध्याकाळी 6.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जातं.

तर काही सूत्रांच्या मते 9 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो आणि यात कुणाकुणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले.

मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24