तुम्ही घेतलेली लस बनावट तर नाही ना?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- कोरोना महारोगराईचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण अभियानाला वेग देण्यात आला असतानाच याचा गैरफायदा घेत आर्थिक फायद्यासाठी काहींकडून बनावट लसीं बाजारात आणण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) यापूर्वीच दक्षिण-पूर्व आशिया तसेच आफ्रिकेत बनावट कोविशील्ड लस आढळून आल्याबाबत इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर आल्याने खबरदारी म्हणून कोरोनाच्या बनावट लसींसंबंधी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना लस टोचण्यापूर्वी ती बनावट तर नाही? याची खातरजमा करून घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लशींसंबंधी अलर्ट देखील जारी केला आहे.

खऱ्या लशीच्या कुप्यांची ओळख कशी पटवायची, यासंबंधीची माहिती केंद्राकडून राज्यांना पाठवण्यात आली आहे.

कोविशील्ड, कोव्हॅक्सिन तसेच स्पुटनिक-व्ही लसीचे आवरण, त्याचा रंग , ब्रॉन्ड नाव यांसंबंधीची विस्तृत माहिती त्यातून देण्यात आली आहे.

कुपीच्या बाटलीवर खालील तपशील असावेत एसआयआय उत्पादन लेबल ट्रेडमार्क असलेले ब्रँड नेम जेनेरिक नावाचा फॉन्ट अन-बोल्ड असेल Recombinant समान फॉन्टमध्ये सामान्य नावाच्या खाली नमूद केले जाईल.

CGS विक्रीसाठी नाही लेबलच्या चिकट बाजूला एसआयआय लोगो असेल. लेबल कलर शेड गडद हिरवा आहे आणि अॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील गडद हिरवा.

Ahmednagarlive24 Office