अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- आमचे कुटुंब व माझे वडील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील आम्ही आमचे नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील या गटाचे असून, आमचा पक्ष हा विखे आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केले आहे आणि पुढेही करू. तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार करणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्न करत राहील. असे मत अमोल राळेभात यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल राळेभात यांचा बोर्ले येथे सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, बिनविरोध निवडुन आण्यासाठी माझे वडील जगन्नाथ ( तात्या ) राळेभात बंधु सुधीर (दादा )राळेभात यांची प्रमुख भुमिका होती तसेच तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन व सचिव आणि आमच्या राळेभात कुटुंबार प्रेम करणाऱ्या सर्व शेतकरी सभासदांनी मला मोलाचे सहकार्य केले आहे.
त्यामुळेच आज मी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आज कमी वयातील संचालक होण्याचा मान मिळाला आहे. त्याचसोबत माझी उमेदवारी ठेवून नवा संकल्प घडवला, हा सर्व शेतकरी सभासदामुळे मान मिळाला आहे. शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही अडचण येऊ देणार नाही, मी आपल्यासाठी सदैव हजर आहे.
मी सदैव शेतकरी हितासाठी काम करेल. आपला देश कृषिप्रधान आहे. मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. बँकेसंदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी मी नेहमी शेतकऱ्यांबरोबर असेल. असे अश्वासन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आमोल राळेभात यांनी दिले.