अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचा कहर आता काहीसा कमी होऊ लागला आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गाव आता कोरोनमुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे तर काही गावे कोरोनामुक्त झाले आहे.
यातच पारनेर तालुक्यातील दरोडी गाव हे केवळ एक महिन्याच्या आतमध्येच कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट एप्रिलपासून सुरू झाल्यावर दरोडी गावात लाट रोखण्यासाठी ग्रामस्थ एकजूट झाले. गावात मास्क वापरणे सक्तीचे केले.
गावात कुणालाही विनाकारण फिरू द्यायचे नाही, असा निर्णय घेतल्याचे सरपंच सुमन पावडे यांनी घेतला. सांगितले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले. यामुळे मेपर्यंत कोरोना गावापासून रोखण्यात यश मिळविले. ४ मे रोजी दरोडीत एक रुग्ण बाधित झाला.
बाधित झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करून बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. किरकोळ लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवले.
त्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय घरे घेऊन त्यांची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, टीमवर ठरवून देऊन त्यांची आरोग्याची माहिती घेऊन काही वाटले तर लगेच आरोग्य तपासणी करणे, अशा उपाययोजना राबविल्या आणि दरोडी गाव २२ दिवसांत ग्रामस्थांच्या एकजुटीने कोरोनामुक्त झाले.