अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यातच कोरोना लसीकरण मोहीम वेगाने चालवली जात असल्याने रुग्ण वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे.
जिल्ह्यात रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढते आहे. यातच हिवरे बाजार पाठोपाठ आता नगर तालुक्यातील एक गाव कोरोनामुक्त झाले आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी जबाबदारीने पालन केल्याने आणि ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे नगर तालुक्यातील विळद हे गाव करोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच संजय बाचकर यांनी दिली आहे.
विळदमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढता करोना संसर्ग गावाची चिंता वाढविणारा होता. करोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, अंगणवाडी सेविका,
आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे योग्यरित्या पालन करून करोनाला अखेर गावातून हद्दपार केले.