अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गावाचा विकास होत असताना त्यासाठी सर्व गाव एकत्र आले तर नक्कीच विकासात्मक कामे होत असतात चितळवेढे गावचा आदर्श माझ्या मनात पहिल्यापासून या गावावर माझे वडील यमाजी लहामटे हे पहिल्यापासून प्रेम करत होते हे गाव वारकरी संप्रदायाची पताका असून अनेक वर्षे या गावाने एक विचाराने लढा दिला म्हणून या गावाने एकसंघ राहून आपली माती आपली माणसं हे संपूर्ण राज्याला दाखवून दिले.
तर विकासात्मक कामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे निवडणूका येतात, जातात राजकीय जोडे बाजूला ठेवून जेव्हा जेव्हा आपण मला मोठ्या सन्मानाने याठिकाणी बोलावले, तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी आलो, यापुढे देखील चितळवेढे गाव नेहमी माझ्या मनात असून या गावासाठी जेजे काही देणे मला शक्य आहे.
तेथे मी देत राहील असे आव्हान अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण लहामटे यांनी काल चितळवेढे येथे मास्क व सॅनिटायझर वितरण संपूर्ण गावात भूमिपुत्र विश्वास आरोटे कडून गावासाठी सॅनिटायझर व मास्क वितरण सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी चिळवेढे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ आरोटे, चितळवेढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र आरोटे, स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी नारायण आरोटे, उत्कृष्ट शेतकरी किसनराव वाकचौरे, संजय आरोटे, योगेश आरोटे, मधुकर मोहटे,
शिवाजी आरोटे, दत्तात्रय आरोटे, बाळासाहेब आरोटे, पाटीलबुवा आरोटे, दिना आरोटे, अविनाश आरोटे, योगेश संपत आरोटे, मच्छिंद्र आरोटे, सखुबाई आरोटे, बबुबाई आरोटे यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. किरण लहामटे यांनी पुढे बोलताना सांगितले की या गावाला महत्त्वाची असणारी ग्राम संसद ही इमारत येण्यासाठी या गावातील तरुणांनी एक हाक दिली, या हाकेला मी तात्काळ पंधरा लक्ष रुपये इमारत दिली.
या पुढील काळात देखील आपण जे जे विकास कामे मला सुचवाल ती पूर्ण करून देण्यासाठी व चितळवेढे गाव मी विकासात्मक करण्याच्या दृष्टीने कायम बांधील राहील. या भागातील चितळवेढे ते राजुर या दरम्यान असणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून
तातडीने संबंधित अधिकार्यांना या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावी. या रस्त्यावरील पुलाचे काम देखील तातडीने करण्यात यावी. तर इतर वेळी हा दुसरा रस्ता देखील अत्यंत खराब असून तो डांबरीकरणासाठी मंजूर असून त्याचे देखील लवकर काम सुरू व्हावे.
यासाठी मी प्रयत्न करेल, ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकार्यांनी गावाने विश्वासाने आपल्याला बिनविरोध केली असून आपण देखील तेवढ्या विश्वासाने अनेक वर्ष विकासकामांचा ब्लॉग रिक्त राहिला असून तो भरून काढावा तो भरून काढण्यासाठी जी काही मदत लागेल.
ती मदत करण्यासाठी मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने जी काही मदत लागेल ती करण्यासाठी कायम आपल्या पाठीशी राहील. मला राजकीय जोडे निवडणुकीनंतर बाजूला ठेवले आहे. तर तरुणांनी व जनतेने जो एकमुखी निर्णय दिला.
तो मला मान्य आहे. विकास कामासाठी सदैव मी तुमच्याबरोबर राहील असाच शब्द त्यांनी दिला. यावेळी संपूर्ण गावातील 225 कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क व सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले.
या गावचे भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या वतीने संपूर्ण गावाला मोफत सॅनिटायझर व मास्क मोफत देण्यात आले.
तर संपूर्ण गावातील घराघरातील सभासदांना ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. पी. कोल्हे, कर्मचारी दगडू आरोटे, बाळासाहेब आरोटे, शांताराम सोनवणे यांनी वितरण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.