कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे गाव 3 दिवस कडकडीत बंद राहणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे.

नुकतेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील एकरुखे येथे करोना विषाणूचे 2 दिवसात 5 ते 7 जण रुग्ण निघाल्यामुळे एकरूखे गाव 3 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के बंद राहील, असे एकरूखे ग्रामपंचायतच्या वतीने व्यापार्‍यांना नोटीस देऊन सूचना देण्यात आल्या आहेत.

गावातील वाढती रुग्णसंख्या पाहता सरपंच जितेंद्र गाढवे व ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी रविवार दि. 14 मार्च ते मंगळवार दि. 16 मार्च पर्यंत तीन दिवस फळ, भाजीपाला, चिकन-मटण व फेरीवाल्यांसह 100 टक्के गाव बंद राहील.

यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाना व मेडिकल दिवसभर सुरू राहील तर दूध डेअरी 6 ते 8 पर्यंत चालू राहील. असा निर्णय घेतला आहे. प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

अन्यथा गाव बंदचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार करवाई करण्यात येईल. यामुळे या आदेशाचे पालन करणे सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे. असे ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आवाहन केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24