यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी दिला प्लाझ्मा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले.

तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने गावात रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप देखील करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार निलेश लंके युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय औटी, सरपंच मनोज कोकाटे, प्रतीक कोतकर, सुरज शेळके, बलभीम कर्डिले, रघुनाथ होळकर, बंडू गुरुजी, गौरव नरवडे, सिद्धांत आंधळे, शिवाजी होळकर,

सोमनाथ जपकर, सौरभ जपकर, सुभाष जपकर, राहुल कांडेकर, नितीन कदम, ऋषी खामकर, नितीन जपकर, लहू जपकर, बंडू जपकर, आनंद मांढरे, बाबू गोड, सुरज खताडे, सुनील भांडे, पप्पू आंधळे, संजू बोरुडे, अक्षय पाचरणे,

विशाल पवार, सोमनाथ साळवे, गौरव गाडेकर, जय जाधव, पांडुरंग मोरे, आदिनाथ होळकर, गौरव नागापुरे, श्रीपाद सुरसे, शुभम आजबे, बंडू सातपुते, शुभम जपकर आदिंसह गावातील युवक उपस्थित होते. अक्षय कर्डिले म्हणाले की,

सर्व संकटात असताना उत्सव साजरा न करता रक्तदान शिबीराचा उपक्रम राबवून नेप्तीच्या युवकांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. संकटकाळात सर्वांनी आपल्या परीन योगदान देणे आवश्यक आहे. सध्या रक्ताची व प्लाझ्माची गरज भासत आहे.

युवाशक्ती एकवटल्यास कोरोनारुपी संकटाला परतवून लावता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विजय औटी यांनी कोरोनाच्या संकटकाळात आमदार निलेश लंके युवा प्रतिष्ठान सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य करीत आहे.

नेप्ती गावातील युवकांनी घेतलेला निर्णय प्रेरणादायी व गरजूंसाठी जीवनदायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रक्ताचा व प्लाझ्माचा तुटवडा भासत असल्याने युवकांनी यात्रा उत्सवाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविला.

तर कोरोनाचे संकट टळण्यासाठी ग्रामस्थांनी बिरोबा चरणी प्रार्थना केली. गावातील युवकांनी राबविलेल्या रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24