Hero Vida V1 : प्रतीक्षा संपली.. आजपासून सुरू झाली Hero Vidaची डिलिव्हरी, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Vida V1 : भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री होत आहे. अनेकजण वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक स्कूटर वापरू लागले आहे. त्यामुळे सर्व कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीवर भर देत आहेत.

अशातच आजपासून हीरो मोटोकॉर्पच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून ग्राहक या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्कूटर जबरदस्त रेंज देत आहे.

किती आहे किंमत 

हिरोने ही स्कूटर Vida V1 प्लस आणि Pro अशा दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. त्यापैकी Vida V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) तर Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

मिळेल जबरदस्त रेंज

यापैकी V1 Pro 165 किमीच्या IDC रेंजचा दावा करते तर V1 Plus 143 किमीच्या IDC रेंजचा दावा करते. या स्कूटरला तुम्ही पोर्टेबल चार्जरने चार्ज करू शकता. तसेच या स्कूटरसोबत सार्वजनिक फास्ट चार्जरही कंपनीने दिला आहे. त्याचबरोबर, बॅटरी पॅक पोर्टेबल असून ती बाहेर काढली जाऊ शकते.

जास्त स्पीड

Vida V1 Pro 3.2 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास तर V1 प्लसला 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 3.4 सेकंद लागतात. या दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास इतका आहे.

फीचर्स

फीचर्सबद्दल सांगायचे झाले, तर Vida V1 मध्ये क्रूझ कंट्रोल, रायडिंग मोड्स, कीलेस कंट्रोल, SOS अलर्ट, फॉलो-मी होम हेडलॅम्प्स, फाइंड-मी लाईट्स, एलईडी लाइटिंग आणि इतर अनेक फीचर्स कंपनीने दिली आहेत. मोठ्या आसनाखालील स्टोरेजमुळे Vida V1 खूप व्यावहारिक वाटते. रायडरसाठी 7-इंचाची TFT स्क्रीन आहे जी स्मार्ट कनेक्ट केलेल्या फीचर्ससह येते.

या दोन्ही स्कूटर्सना कदाचित OTA अपडेट मिळेल. त्यामुळे भविष्यात त्या अधिक चांगल्या आणि अधिक फीचर्ससह सुसज्ज होऊ शकतात. तसेच कंपनीने या स्कूटरला रिव्हर्स असिस्ट, टू-वे थ्रॉटल आणि क्विक ओव्हरटेकसाठी बूस्ट मोड सुसज्ज आहे. याशिवाय यात स्वॅप करण्यायोग्य बॅटरी तंत्रज्ञान वापरले आहे.

मिळेल आणखी एक जबरदस्त फीचर 

कंपनीने यात लिंप होम सेफ्टी नावाचे फीचर दिलेआहे, जे स्कूटरचा टॉप स्पीड 10 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित करते आणि जवळजवळ बॅटरी संपल्यानंतर ही स्कूटर 8 किमी पर्यंत अंतर कापते.

हा स्कूटरला देणार टक्कर 

कंपनीची ही स्कूटर बाजारातील इतर स्कूटरला टक्कर देईल. यामध्ये Ola S1 Pro, Ather 450X Gen3, Bajaj Chetak आणि TVS iQube सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे.