Ajab Gajab News : इतिहास साक्षी आहे की आजवर विकसित झालेल्या मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसित झाल्या आहेत. कारण नद्या या आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे त्या प्रदूषित होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक मानवाची आहे.
जगभरामध्ये काही लांब तर काही रुंद पात्राच्या अनेक नद्या आहेत. पण आज आपण या नदीबाबत जाणून घेणार आहोत, त्या नदीचे नाव आहे ‘रुकी’. या नदीचे पाणी कोळशापेक्षाही काळेकुट्ट आहे.
आफ्रिकेतील जगप्रसिद्ध कांगोच्या खोऱ्यामध्ये असलेली ही नदी काळ्या पाण्यामुळे चर्चेत आली आहे. डेलीमेलच्या अहवालानुसार, या नदीचे पाणी इतके काळे इतके काळे आहे की, आपण आपला चेहराच काय तर आपण साधे हातसुद्धा या पाण्यात घालणार नाही.
एवढे काळे पाणी कशामुळे झाले आहे, यासाठी काही संशोधकांनी पुराव्यांच्या आधारावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुळात कांगोचे खोरे हे स्विझर्लंड या देशाच्या आकारापेक्षा चौपट ड्रेनेज बसिन आहे.
यामध्ये सडलेल्या आणि कुजलेल्या झाडांचे कार्बनयुक्त पदार्थांचे खत निघते आणि पाऊस, पुराच्या पाण्यामुळे हे कार्बनयुक्त पदार्थ या नदीच्या पाण्यामध्ये मिसळतात. परिणामी, नदीच्या पाण्याचा रंग इतका काळा होतो की यापुढे कोळशाचा रंगही फिका पडेल. यामुळेच ही काळी नदी जगभरात प्रसिद्ध आहे.