विजयी उमेदवारांचा आदर्श सरपंच भास्कराव पेरे यांच्या हस्ते सत्कार होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी येथील लोकनेते अप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा

औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीत आज सत्कार समारंभ व ग्रामविकास विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

या वेळी आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्यासह पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, दोन्ही तालुक्यांतील सरपंच, उपसरपंच तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील हे पंचायत राजव्यवस्था, ग्रामविकासाच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, तसेच नवनवीन संकल्पना राबवून आपल्या गावचा विकास कसा करता येईल,या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24