महिलेने न्यायाधीशाला पाठवली कंडोमची पाकिटे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांच्या सुनावणी दरम्यान वादग्रस्त र्निणयामुळे न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

गणेडीवाला यांनी जे निर्णय दिले त्यापैकी एकामध्ये असे म्हटले गेले होते की कपडे न काढता 12 वर्षाच्या मुलीच्या छातीला स्पर्श न करणे,

हे पॉस्कोअंतर्गत गुन्हा नाही तर दुसऱ्या निर्णयात मुलीचा हात धरून पँटची झिप उघडणे हे पॉक्सोमध्ये POCSO येत नसल्याचा निकाल त्यांनी दिला होता.

आता या निर्णयाच्या विरोधात गुजरातमधील एका महिलेने गणेडीवाला यांच्या कार्यालयात दीडशे कंडोमची पाकिटे पाठवली आहेत. कंडोम पाठविणाऱ्या महिलेचे नाव देवश्री त्रिवेदी आहे.

देवश्री गुजरातमधील अहमदाबादची असून ती राजकीय विश्लेषक असल्याची माहिती आहे. देवश्री त्रिवेदी यांनी सांगितले की या पॅकेटसमवेत त्यांनी न्यायमूर्ती गणेडीवाला यांना पत्र देखील पाठविले आहे.

देवश्री सांगतात की स्त्री म्हणून तिने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्या मते महिलांना त्यांच्या हक्कासाठी उभे राहिले पाहिजे. त्रिवेदी यांनी सांगितले की त्यांनी 9 फेब्रुवारी रोजी ही पाकिटे पाठविली होती जे मिळाली असल्याची रिसीट देखील त्यांना मिळाली आहे.

न्यायमूर्ती गणेडीवाला यांच्या या आदेशामुळे पुरुष मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यावर देखील सहीसलामत सुटू शकतात. गणेडीवाला यांना लवकरात लवकर त्यांच्या पदावरून निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24