अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात २० आगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोने देण्याचे आमिष प्रकरणी पारधी समाजातील चार व्यक्तींचा खून झाला होता.
याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ व आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात बेलवंडी पोलिसात अक्षदा कुंजा चव्हाण यांनी फिर्याद दिली होती.
यात नाथिक्या कुंदा चव्हाण, श्रीधर कुंजा चव्हाण, नागेश कुंजा चव्हाण, लिंब्या हाबऱ्या काळे या चौघाचा खून झाला होता. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी आशाबाई सोनवणे यांना जामीन मंजूर केला.