गावातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  गावातील सुरु असलेले अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. शेवगाव तालुक्यातील मजलेशहर गावातील महिलांनी येथील पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मजलेशहर येथील राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ बचत गटाच्या महिला सदस्यांनी हे आंदोलन केले.

दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असते. असाच काहीसा प्रकार शेवगाव तालुक्यातील मजलेशहर गावात घडला आहे. गावातील अवैध दारूमुळे अनेकांचे संसार मोडकळीस आले आहेत.

गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे येथे जुगार, मटका, अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली.

तत्काळ कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर १८ ऑगस्टला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी पोलिसांना निवेदन दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24