अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शहराच्या वाहतुकीच्या समस्येला अत्यावश्यक असलेल्या शहरातील एकमेव उड्डाणपुलाचे काम सुरु झालेले आहे.
उड्डाण पुलास नाव देण्यावरुन अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पुढारी यांच्यात पुलाचे नामांतरावरुन स्पर्धा सुरु झाली असून,तरी नामांतराचे राकारण थांबवावे व उड्डाण पुलास खोडा घालू नये,
असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी केले आहे.तात्कालीन खा.दिलीप गांधी यांच्या विशेष पाठपुराव्याने
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिलेल्या उड्डाण पुलाला गेल्या 8-10 वर्षांत अनेक विघ्न-अडथळे पार करत कशीबशी सुरुवात झालेली असतांना
या नामांतराच्या चढाओढीपेक्षा उड्डाण पुलाचे कामात येणारे अडथळे दूर करण्यास सहकार्य करुन पुलाचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल,
यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. उड्डाणपुल पूर्ण झाल्याने अवजड वाहतुक व नगर-पुणे-औरंगाबाद-मनमाड हायवेची वाहतुक या पुलावरुन सुरु होऊन होणारे मोठे अपघात टळतील.
या अगोदर वाहतुकीच्या समस्येमुळे हजारो सर्वसामान्य जनतेचे बळी गेलेले आहेत. त्या कारणाने या उड्डाणपुलाची शहराला अत्यंत आवश्यकता आहे.
त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामास सहकार्य करुन तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.