अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अनैतिक संबंधांच्या कारणातून एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राहूरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गा लगतच्या एका शेतात घडली आहे.
सुनील कांतीलाल गायकवाड (वय-२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. . याबाबत अधिक माहिती अशी कि, आत्महत्याग्रस्त तरुणाचा चुलत भाऊ बाळासाहेब बन्सी गायकवाड हा बांधकाम क्षेत्रात मोलमजुरीचे करीत होता.
त्याच्याकडे मयत सुनील हा दोन दिवसापूर्वी पुणे येथून आला असता त्याच्या चुलत भावास अनैतिक संबंधातील सर्व माहिती सांगून त्या मुलीच्या घरचे मला जीवे मारतील त्यामुळे मला भीती वाटत आहे. रात्रभर मयत सुनील याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु पहाटे ३ वाजेच्या नंतर चुलत भाऊ व त्यांच्या घरातील व्यक्ती झोपी गेले असता मयत सुनील याने घरातून बाहेर पडून नगर-मनमाड महामार्गालगत एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.