अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणातून विवाहित तरुणास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे घडली आहे.
या प्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आप्पाजी बाबाजी देवकर (वय 25, रा.जांबुत बु. धनगर वाडा) यांचे पत्नीसोबत दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते.
तेव्हापासून पत्नी माहेरी गेलेली होती. या कारणावरुन रामदास बाळू खेमनर, योगेश रामदास खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, बाबाजी लहानू खेमनर,
पिंटू खेमनर व इतर चार-पाच जणांनी (सर्व रा.चिंचेवाडी, साकूर) रागातून आप्पाजी देवकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. सध्या जखमीवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत आप्पाजी देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार सुरेश टकले हे करत आहे.