अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
रवींद्र बबन गरुड (वय -27 वर्ष) असे मयत तरुणाचे नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर व तालुक्यात लॅाक डाऊनमुळे काम धंदा गेल्याने हताश झालेल्या रवींद्र ने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र तरीही शासना कडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. दरम्यान रवींद्र यांच्या पश्चात आई,एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.त्याच्या अकाली निधनाने गोंडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.