अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- देशातील युवकांना कोट्यवधी रोजगाराचे खोटे आश्वासन देऊन सत्तेच्या गादीवर बसलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात हे आश्वासन पाळले नाही.
रोजगार निर्मिती सोडा आहे ते रोजगार देखील गेले. यामुळे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे.
तसेच उद्या (दि.17) पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी तांबे म्हणाले, रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून ही बेरोजगारी वाढण्यास केंद्रातील भाजप सरकारची आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत.
त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे. मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे. देशातले उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत असून
फोर्डने नुकतेच भारतातील उद्योग बंद केल्याने प्रत्यक्ष 4 हजार तर अप्रत्यक्ष जवळपास 40 हजार लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला.
युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणार्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे.