अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- आम्ही दिलेले वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत अमोल मधुकर दळवी या युवकास बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील नानज येथे घडली आहे.
अमोल दळवी यास बेदम मारहाण करण्यात आली तसेच त्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी पीडितांच्या फिर्यादीवरून पप्पू केरबा दळवी व राहुल नारायण दळवी रा. नानज या दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील गोपाळ \पुरा येथे संत देणा महाराज मंदिर स्थापनेचे काम सुरु आहे. याची जबाबदारी अमोल दळवी यांचेकडे आहे.
वर्गणीचे पैसे आम्हाला दे असे म्हणत पप्पू व राहुलने अमोल यास बेदम मारहाण केली. याप्रकरणी अमोल याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.