अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- घरासमोर लावलेली १५ हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा मोटरसायकल अज्ञात भामट्याने चोरून नेली आहे.

तालुक्यातील तांभेरे येथे तांबे वस्तीवर मोटरसायकल चोरीची ही घटना घडली. भीमराज तांबे या शेतकऱ्याने नेहमी प्रमाणे आपल्या घराजवळ मोटरसायकल एमएच १७ एएच ८४७१ पार्किंग केलेली होती.

पहाटेच्या वेळात मोटरसायकल गायब असल्याचे दिसून आले. तांबे यांनी बुधवारी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विठ्ठल राठोड करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24