जिल्हा रुग्णालायतून ऑपरेशन थिएटर साहित्यांची चोरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- दोघा चोरट्यांनी जिल्हा रुग्णालयातून ऑपरेशन थिएटर उभारणीसाठी आणलेल्या 81 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे ठेकेदार आहेत. त्यांना हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरचे काम मिळाले आहे.

त्यांनी या कामासाठी लागणारे साहित्य हॉस्पिटलमधील एका रूममध्ये ठेवले आहे. चोरट्यांनी रूमचा दरवाजा तोडून यातील 81 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.

याप्रकरणी रोशी कैलास काला (वय 36 रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

लखन अनिल घोरपडे (वय 28) व मुरलीधर विश्‍वनाथ पाखरे (वय 55) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पाखरे याला अटक केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24