अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-सध्या चोरटे कधी व कोणती वस्तू चोरून नेतील याबाबत काही सांगता येणार नाही.कारण अलीकडे चोरांनी गाय, बैल, शेळी यासह जी वस्तू हातात सापडेल ती पळवण्याच्या घटना घडल्या आहेत.
असाच प्रकार बालिका आश्रम रोडवरील एका पेट्रोल पंपावर घडला आहे. या ठिकाणी असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून नेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील बालिका आश्रम रोडवरील बोरुडे मळा परिसरात एसार पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी इतर झाडा सोबत चंदनाचे देखील झाड होते.
रात्रीच्या वेळी पंपावर वॉचमन नाईट ड्युटीवर असताना अज्ञात दोन चोरांनी हे चंदनाचे झाड कशाने तरी कापून नेले आहे. याबाबत वॉचमन शंकर किसनराव डहाळे ( वय ५५, रा. बोरुडे मळा अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे .
त्यावरून तोफखाना पोलिसांनी अज्ञान दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोना. गव्हाणे हे करत आहेत.