चोरी दोनशे रुपयांची, मागणी पोलीस संरक्षणाची

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- देवळाली प्रवरा येथील गणेश हौसिंग सोसायटी मधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष सालके यांच्या घरी शनिवारी मध्यराञीच्या सुमारास शोकेस मधील अवघ्या दोनशे रुपयांच्या वस्तूंची चोरी झाली.

माञ या मुख्याध्यापकाने म्हातारी मेल्याचे दुःख नाही,पण काळ सोकायला नको म्हणून पोलीस खात्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

सालके यांच्या मागणीवर पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा बाजारतळा नजीक गणेश हौसिंग सोसायटी आहे.

या सोसायटीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष सालके व त्यांची पत्नी असे दोघे राहतात.शनिवारी माध्यराञी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंगल्यात शिरुन शोकेस मधील हरीण,

कुञ्याचे शो पीस, मुलीच्या लग्नात भेट मिळालेले भिंतीवरील घड्याळ असा एकुण दोनशे रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला.

या चोरीची खबर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सालके यांनी थेट पोलीस ठाण्यात दिली.त्याच बरोबर पोलीस संरक्षणाची मागणी करणारा अर्ज हि दाखल केला आहे.

पोलीसांकडे संरक्षणा संदर्भातील अर्ज प्राप्तीस दुजोरा देण्यात आला आहे. सदर अर्ज वरीष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.त्यावर वरीष्ठच काय निर्णय घ्यायचा ते घेतील.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक सालके यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता.ते म्हणाले की, दोनशे रुपयाच्या वस्तू जरी चोरी गेल्या असल्या तरी त्या वस्तू माझ्यासाठी मौल्यवान होत्या.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकायला नको म्हणून मी संरक्षणाची मागणी केली आहे.संरक्षण मिळाले नाही तर मी आंदोलनाचा पविञा हाती घेईल.

पण संरक्षण मिळविलच.पोलीसांनी माझ्या चोरीचा तपास लवकर लावावा अन्यथा मी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार आहे.

असे हि त्यांनी सांगितले सेवानिवृत्त मुख्याध्यापक सालके यांनी पोलीस ठाण्याकडे केलेल्या अर्जावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.खरंच पोलीस या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास संरक्षण देणार का?

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24