शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात गुन्हेगारी वाढली आहे. चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुक्तेश शहरातीक दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

नगर शहरातील तपोवन रोडवरील ढवणवस्तीवर बिरोबा मंदिराजवळ असलेल्या निता सुनील आव्हाड यांचे बंद घर फोडून सात हजारांची रोख रक्कम, दीड हजार रूपयांचे घड्याळ व सोन्याचे दागिने असा 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

आव्हाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना शहरातील पाईपलाईन रोडवरील पवननगरमध्ये घडली. अविनाश श्रीकांत गोफणे यांच्या घराच्या टेरेसवरील दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

पाकिटामध्ये ठेवलेली पाच हजारांची रक्कम, गोफणे यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

दरम्यान आता शहर परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24